अहमदनगर :- निष्क्रीय मंत्रींना डच्चू दिलेल्या भाजपच्या निर्णयाचे मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन व पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने स्वागत करण्यात आले असून,
प्रा.राम शिंदे यांना पालकमंत्री पदापासून हटवून राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्याची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती अॅड.कारभारी गवळी यांनी दिली.

महाराष्ट्राचे मागील गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहेता निष्क्रीय व भ्रष्टाचारी ठरल्याने त्यांना डच्चू देण्यात आले. हे खाते जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आले असून,
घरकुल वंचितांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. येत्या विधानसभा निवडणुकिच्या पुर्वी घरकुल वंचितांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्यास न्याय मिळणार असल्याची अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
तर पालकमंत्री प्रा.राम शिंदे अहमदनगर जिल्ह्यासाठी कुचकामी ठरले आहेत. त्यांच्या मतदार संघा पुरतेच मंत्री ठरले असून,
त्यांनी इतर भागाकडे लक्ष दिले नाही. घरकुल वंचितांचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी एकदाही बैठक घेतली नाही व यावर उपाययोजना देखील केल्या नाहीत.

प्रा.शिंदे यांच्याकडून इतर खाते काढून घेण्यात आले ही चांगली गोष्ट झाली आहे. दुष्काळात जलसंधारणाची कामे करण्याऐवजी त्यांनी जिल्हा विभाजनाचा प्रश्न अधिक महत्त्वाचा वाटला.
जिल्हा प्रशासनावर वचक नसल्याने अनेक विकासकामे रेंगाळली असल्याचा संघटनेच्या वतीने आरोप करण्यात आला आहे.
तर पालकमंत्री पदाची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील हे सक्षमपणे पेळवणार असल्याची आशा व्यक्त करण्यात आली आहे.
ना.विखे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते असून, त्यांचा दांडगा अनुभव आहे. तसेच शासकीय अधिकारी आणि कर्मचार्यांवर त्यांचा वचक असून,
याचा फायदा जिल्ह्यासाठी होणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
- Vikram Solar Share Price: सौर ऊर्जा क्षेत्रातील ‘या’ शेअर्समध्ये मोठी तेजी! अप्पर सर्किट हिट…BUY करावा का?
- 7th Pay Commission: दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांची दिवाळी? महागाई भत्त्यात होणार मोठी वाढ? समोर आली महत्वाची माहिती
- Ration Card: आता घरबसल्या काढा मोफत नवीन रेशनकार्ड! वापरा ‘या’ स्टेप…एका क्लिकवर वाचा A टू Z माहिती
- Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीसाठी खुशखबर! खात्यात ‘या’ महिन्यात जमा होणार 3 हजार? वाचा माहिती
- Goods Price: सणासुदीत करा जोरात खरेदी! दैनंदिन वापरातल्या वस्तू मोठ्या प्रमाणावर होणार स्वस्त… बघा माहिती