अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : कंटेन्मेट झोनच्या नावाखाली माळीवाडा भागातील नागरिकांच्या उपासमारीची सुपारी आयुक्त व महापालिकेतील काही हुशार अधिकाऱ्यांनी घेतली आहे, असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केला.
कोरोना रुग्ण आढळल्यानंतर हा भाग कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे. या भागात आवश्यक सोयी-सुविधा देण्याची जबाबदारी मनपाची आहे.
तथापि, नागरिकांना गॅस सिलिंडर, औषधे मिळत नाहीत. गरोदर महिलांची नियमित तपासणी होत नाही. मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूरसह राज्यातील सर्व जिल्ह्यांत ज्या घरातील व्यक्ती पाॅजिटिव्ह आढळून येईल तिच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.
नगर शहरात मात्र रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण परिसर सेल केला जात आहे. लाॅकडाऊनमुळे जनतेचे कंबरडे मोडले असताना कंटेन्मेंट झोनच्या नावाखाली १० ते १५ हजार लोकांची गैरसोय केली जात आहे.
माळीवाडा भागातील रेशनची पाच दुकाने बंद असल्याने धान्य मिळत नाही. औषधाची दुकानेही बंद केली. याचा मनपाने फेरविचार करावा.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews