अहमदनगर ब्रेकिंग :शिर्डी खूनप्रकरणी दोघेजण ताब्यात !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : शिर्डी बस स्थानकासमोरील व साईबाबा रूग्णालयाच्या लगत असलेल्या सार्वजनिक शौचालयात एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. याप्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राजू माळी व सुनील तांबोरे अशी त्या आरोपीची नावे आहेत. शनिवारी सकाळी ३५ वर्ष वय असलेल्या तरुणाचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. यातील मयत व्यक्तीचा चेहरा ओळखू येवू नये म्हणून दगडाने ठेचण्यात आला होता़

या घटनेचे वृत्त कळताच पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे, शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक दिपक गंधाले, मिथून घुगे, वाहतूक शाखेचे निरीक्षक नितिनकुमार गोकावे यांच्यासह पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली़.

मयत व्यक्ती बांधकाम मजूर असण्याच्या शक्यतेने या परिसरात नेहमी वावर असलेल्या बांधकाम कामगारांकडे चौकशी सुरू केली असून. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजही तपासण्यात आले़ मात्र मयत व्यक्तीची ओळख पटली नव्हती़.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment