अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या करुन जीवन संपवल्याचे वृत्त हे अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे.
वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी त्याने अशा पद्धतीने घेतलेली एक्झिट मनाला चटका लावून गेली.
सुशांतच्या निधनाने चित्रपटसृष्टीने एक तरुण प्रतिभाशाली अभिनेता गमावला आहे,
अशा शब्दांत महसूलमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शोकभावना व्यक्त केल्या.
सुशांतने टीव्ही अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात केली. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या जीवनावर
आधारित ‘एम एस धोनी एनटोल्ड स्टोरी’ हा सुशांतचा चित्रपट रसिकांच्या मनात घर करून गेला, असे थोरात म्हणाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews