अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या श्रीमार्कंडेय विद्यालयातर्फे (गांधी मैदान) त्यांना अडुळसा, हिरडा, बेहडा, तुळस, निलगिरी अशा ५० विविध प्रकारच्या वनौषधी भेट देण्यात आल्या.
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून “झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, संकल्प नव्हे कृती करू या” हा सामाजिक संदेश या माध्यमातून दिला गेला.
यावेळी पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ विश्वस्त शरद क्यादर, सचिव बाळकृष्ण सिद्दम, ज्येष्ठ विश्वस्त अरविंद चन्ना, शंकर सामलेटी, विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक दीपक रामदिन,
श्रमिक नगर शाखेतील प्राथमिकच्या मुख्याध्यापिका दगडे, माध्यमिकचे गोरे, चन्ना, ग्रंथपाल रंगा, अंकम, न्यालपेल्ली, आनंदास, बोडखे आदी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून उपस्थित होते.
मुख्याध्यापक रामदिन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शिक्षक पालक सभा झाली. प्रास्ताविक पर्यवेक्षिका रच्चा यांनी केले. उपमुख्याध्यापक गोने यांनी सभेपुढील विषय मांडले. शालेय व्यवस्थापन समिती, विकास व्यवस्थापन समिती, आपत्ती व्यवस्थापन समिती यावेळी स्थापन करण्यात आली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews