अहमदनगर Live24 ,17 जून 2020 : व्हाट्सअप स्टेटसला माझा फोटो का ठेवला नाही. अशी करत चौघांनी एका तरुणावर कोयता व लाकडी दांड्याने प्राणघातक हल्ला करून त्याला जखमी केले.
शहरातील बालिकाश्रम रोड परिसरातील निलक्रांती चौकात ही घटना घडली. या हल्ल्यात अमोल हिरामण गायकवाड (वय १९ रा. गौतमनगर, निलक्रांती चौक) हा गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी टिंग्या उर्फ सुमेघ साळवे, गौरव साळवे महेश परदेशी व सोन्या नाळकोर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी यातील सुमेघ साळवे, महेश परदेशी व सोन्या नाळकोर यांना अटक केली, तर गौरव साळवे हा फरार आहे. याबाबत सविस्तर असे कि, दि. १४ जून रोजी रात्री अमोल गायकवाड व त्याचा भाऊ हे त्यांच्या घराच्याबाहेर उभा असताना तेथे वरील चौघेजण आले.
त्याने गायकवाड याला सुमेघ साळवे याचा फोटो स्टेटसला का ठेवला नाही अशी विचारणा करत, या चौघांनी त्याच्यावर हल्ला केला. यावेळी सुमेघ साळवे याने कोयत्याने गायकवाड याच्या डोक्यात वार गेल्याने तो गंभीर जखमी झाला. असे याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मुंडे हे करत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews