अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : वनविभागाच्या मदतीने नाग जातीच्या सापाच्या 26 अंड्यातून 26 पिल्ले जन्माला घालण्यात अकोले येथील सेव्ह अँनिमल टिमच्या सर्पमित्रांना यश आले आहे.
ही सर्व नागाची पिल्ले जंगलात सोडून देण्यात आली. याबाबत माहिती अशी की, अगस्ती सहकारी साखर कारखाना परिसरात मंगेश नाईकवाडी हे आपल्या शेतात काम करत असताना एक नाग जेसीबीखाली आल्याने मृत झाला आणि दुसरा गायब झाला.
अशा वेळी त्या ठिकाणी सापाची 26 अंडी आढळून आली. त्यांनी सर्पमित्र धनंजय मोहिते व त्यांच्या मित्रांना बोलवून घेतले.
यावेळी सर्पमित्रांनी या परिसराची पाहणी केली तेव्हा आता नाग या अंड्याजवळ पुन्हा येऊ शकणार नाही आणि त्यामुळे अंड्यातील पिल्लेही मरून जातील
असे समजून त्यांनी नागाची ती 26 अंडी घेऊन जाऊन आवश्यक त्या पद्धतीने तापमानात ठेवून या अंड्यातून 26 पिल्ले जन्माला घातली आणि वन विभागाच्या मदतीने त्यांना जंगलात सोडून जीवदान दिले.
ती सर्व अंडी जर त्याच ठिकाणी ठेवली असती तर काही दिवसांमध्ये जन्माला येणारी नागाची पिल्ले जन्माला येण्याच्या अगोदरच मरण पावली असती
त्यामुळे ती सर्व अंडी त्या ठिकाणावरून घेऊन त्या अंड्यांना वनाधिकारी यांच्या समवेत घेऊन व्यवस्थित उष्ण, दमट वातावरण निर्माण करून त्या अंड्याना त्या ठिकाणी ठेवले होते.
ही 26 सापाची पिल्ले जन्माला घालण्याच्या प्रक्रियेबरोबर त्यांना जंगलात सोडण्यापर्यंत सेव्ह अँनिमल टिमचे सर्पमित्र धनंजय मोहिते, चैतन्य कदम,
किरण शिंदे, सुनील पवार यांच्याबरोबर अकोले तालुक्यातील वनक्षेत्रपाल श्रीमती बी.एम.पोले, वनपाल एल.पी.शेंडगे, वनरक्षक डी.व्ही.कोरडे यांनी मदत केली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews