श्रीगोंदा :- आम आदमी पार्टीकडून लोकसभा निवडणूक लढविलेल्या अभिनेत्री दीपाली सय्यद पुन्हा एकदा निवडणुक लढविण्याची शक्यता आहे.
यावेळी त्या विधानसभेची निवडणूक लढविण्यास इच्छूक असून श्रीगोंद्यातून विधानसभा मतदारसंघातून त्यांनी तयारी सुरू केली आहे.
शिवसंग्राम पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा असलेल्या सय्यद यांनी रविवारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन यासंबंधीचे संकेत दिले आहेत.
विशेष म्हणजे या बैठकीला शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे हेही उपस्थित होते.
सध्या युतीच्या जागा वाटपात भाजपाकडे असलेला श्रीगोंदा मतदार संघ युतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसंग्राम पक्षाकडे घेण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला.
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना धक्का
राज्यात भाजप- सेनेची युती निश्चित मानली जाते. प्रत्येकी 135 जागांची दोन्ही पक्षात वाटणी झाली असून घटक पक्षाला 18 जागा देण्याचे यापूर्वीच ठरलेले आहे.
यामध्ये शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी चार जागांवर दावा केला आहे. यात नगर श्रीगोंदा मतदार संघाचाही समावेश असल्याची चर्चा आहे.
या मतदार संघात अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे चांगले काम असून त्याना उमेदवारी देण्यासाठी मेटे यांनी जोरदार तयारी केली आहे.
दीपाली सय्यद चाहता वर्ग ह्या मतदार संघात असून ही जागा जर शिवसंग्राम पक्षाकडे गेल्यास माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना मोठा धक्का बसणार आहे.
- मराठा आरक्षण सुनावणी लांबणीवर ; उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीची झाली दिल्लीला बदली
- अमित शाहांची तडिपारी दरोडा,चोरीसाठी नव्हती ! भाजप नेते विनोद तावडेंचे पवारांवर टीकास्त्र
- केजरीवाल, सिसोदियांविरुद्ध हवालाकांडाचा खटला चालणार ; दिल्लीच्या रणधुमाळीत अडचणी वाढल्या
- दक्षिण कोरियाच्या पदच्युत राष्ट्रपतींना अखेर अटक ; आणीबाणी लागू करणे भोवले
- झुकरबर्गच्या वक्तव्यासाठी मेटा इंडियाने मागितली माफी