कोपरगाव : शहरातील मनोरुग्ण असलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना मंगळवारी (दि. १८) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी : शहरातील ४२ वर्षीय मनोरूग्ण पिडीत महिलेवर मंगळवारी
(दि. १८) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आरोपी विनोद बन्सीलाल लोंगाणी याने बळजबरीने बलात्कार केला.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विनोद लोंगाणी (रा. शिवाजीरोड कोपरगाव)
याच्याविरुद्ध गु.र.नं. २१४/२०१९ भादंवि ३७६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे.
- लष्करी हद्दीतील समस्यांबाबत खा. लंके यांची बैठक नागरी समस्या तसेच बेलेश्वर, खोपेश्वर मंदिर विकासाचा प्रश्न मार्गी लागणार
- मुंबई ते गोवा प्रवास होणार वेगवान ! दोन्ही शहरांमधील प्रवास 6 तासांवर येणार, ‘हा’ महामार्ग लवकरच खुला होणार
- कौतुकास्पद ! UPSC परीक्षेत पुण्यातील अर्चितचा देशात तिसरा नंबर !
- मोठी बातमी ! चौंडी मंत्रिमंडळ बैठकीच्या निविदा जाहिरातीतील गोंधळावर सार्वजनिक बांधकाम विभागाचा खुलासा
- ओंकार खुंटाळेचे युपीएससी परीक्षेत यश!