‘त्या’ रसायनामुळे विहिरीचे पाणी दूषित

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 : एका अज्ञात टँकरमधुन रस्त्यालगतच्या पुलावरून टँकरमधून ओढ्यात कसलेतरी रसायन सोडले. मात्र या रसायनाने परिसरातील विहिरीतले पाणी दूषित झाले असून,त्याचा पिवळसर रंग झाले आहे.

याप्रकरणी जवळे येथील रसायनाच्या पाण्याचे नमुने पुणे येथील लॅबला तपासणीसाठी पाठविले आहेत. अहवाल आल्याशिवाय शेतक-यांनी पाण्याचा वापर करू नये. असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील जवळे येथील सिद्धेश्वर ओढ्यात शिरूर-निघोज रस्त्यालगतच्या पुलावरून मंगळवारी (दि.२३) रात्री कोणीतरी अज्ञात व्यक्तीने एका टँकरमधून सिद्धेश्वर ओढ्यात रसायन सोडले होते.

चार दिवस होऊनही तो टँकर चालक, मालक कोण होता? याबाबत प्रशासनाला शोध लागलेला नाही.मात्र टँकरमधून सोडलेल्या रसायनाने आता रंग बदलला आहे.

चार दिवसानंतर त्या परिसरातील विहिरींमधील पाणी पिवळसर झाले आहे. याबाबत ग्रामसेवकांनी सांगितले की, रसायनाच्या पाण्याचे नमुने पुणे येथील लॅबला तपासणीसाठी पाठविले आहेत. अहवाल आल्याशिवाय शेतक-यांनी पाण्याचा वापर करू नये.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment