अहमदनगर ब्रेकिंग : 36 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : अकोले तालुक्यातील कृषीउत्पन्न बाजार समिती या परिसरात राहणार्‍या एका 36 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.

काल मंगळवार दि. 30 रोेजी कोरोनाशी लढा देत असताना या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान या मृत कोरोनाबाधित व्यक्तीच्या सानिध्यात आलेल्या सहा जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून केवळ चार अहवाल येणे बाकी आहे.

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज सकाळी जिल्ह्यात १० पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : आज सकाळी जिल्ह्यात १० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामध्ये नगर शहर ०७, अकोले तालुका ०२ आणि संगमनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

नगर शहरातील सिद्धार्थ नगर येथील ३० वर्षीय पुरुष, सुडकेमळा येथील ५० वर्षीय महिला आणि पदमा नगर येथील ५७ वर्षीय महिला, २५ वर्षीय महिला,

६० वर्षीय पुरुष, ११ वर्षाचा मुलगा आणि ३० वर्षाचा युवक बाधित आढळून आला आहे.यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील हे सर्व रुग्ण आहेत.

अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील २६ वर्षीय युवक आणि १७ वर्षीय युवती बाधित आढळून आली आहे. हे दोघे रुग्ण मुंबईहून प्रवास करून आले होते.

संगमनेर तालुक्यातील कुरण येथील ३५ वर्षीय युवक बाधित आढळून आला आहे.हा रुग्ण यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment