कंटेनमेंट भागात कर्तव्य बजावणार्‍या पोलीसांना पाणी बॉटलचे बॉक्स वाटप

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :शहरात कोरोनाचे संक्रमण दिवसंदिवस वाढत असताना कंटेनमेंट (हॉटस्पॉट) भागात कर्तव्य बजाविणार्‍या पोलीसांना शरद पवार विचार मंचच्या वतीने पाण्याच्या बॉटलचे बॉक्स वाटप करण्यात आले.

शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विविध ठिकाणी कंटेनमेंट (हॉटस्पॉट) झोन जाहीर करण्यात आले आहे. या भागात कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी सेवा देत आहेत.

या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न उद्भवत असताना शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ सय्यद यांनी पुढाकार घेऊन पोलीसांना पाण्याच्या बॉटलचे बॉक्स वाटप केले.

कंटेनमेंट भागात सेवा देणारे पोलीस व आरोग्य विभागातील कर्मचारी यांना पिण्यासाठी पाणी इतर ठिकाणाहून आनावे लागत आहे.

त्यांची गैरसोय टाळण्यासाठी या भागातील पोलीस व आरोग्य विभागातील कर्मचारी यांना शरद पवार विचार मंचच्या वतीने पाण्याचे बॉटल पुरविण्यात येणार असल्याची भावना सय्यद यांनी व्यक्त केली.

अल्ताफ सय्यद स्वखर्चाने लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून गरजूंना अन्नध्यान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आहे.

विचार मंचच्या माध्यमातून नगर तहसिल कार्यालय, तोफखाना पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दक्षता म्हणून सॅनीटायझेशन कक्ष उभारण्यात आले आहे.

तर चौका-चौकात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीसांसाठी पाणी बॉटल, एनर्जी ड्रिंक, च्यवनप्राश व सॅनीटायझरचे देखील त्यांनी वाटप केले करण्यात आलेले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment