शिर्डी – भरदिवसा दोन सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलींना अज्ञात आरोपीने ५ च्या सुमारास अज्ञात कारणासाठी कशाचे तरी अमिष दाखवून फूस लावून पळवून नेले.
सदर घटना शिडी परिसरातील मिनाक्षी मार्केट भागात घडली असून काही दिवसांपासून शिर्डीत अशा घटना घडत असून पालक वर्गात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी शिडी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही मुलींचे वय १७ वर्ष असून त्या दोन कुटुंबातील आहेत. या मुलांच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र त्या मिळून आल्या नाही. पोसई खरात हे मुलींचा व आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
तीन दिवसापूर्वीच पोलिसांनी प्रसादातून गुंगीचे औषध देवून लुटणा-या महिला आरोपीस पकडले. आता दोन दिवसांपासून दोन अल्पवयीन मुली पळवून नेण्यात आल्याने शिडी परिसरात परप्रांतीय गुंडांची टोळी मुली पळविण्यासाठी आलेली तर नाही ना? अशी भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.