अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : श्रीगोंदा तालुक्यातील कोंडेगव्हाण आणि येळपणे पाठोपाठ चांभूर्डी येथील युवक कोरोना बाधित आढळून आला असून येळपणे गटातील कोरोनाचा शिरकाव झालेले चांभूर्डी हे तिसरे गाव प्रशासनाने बंद केले आहे.
चांभुर्डी येथील हा कोरोना पॉझिटीव्ह युवक गेल्या अनेक दिवसांपासून शिरूर व पुणे भागात रहात होता. तेथे तो वहान चालक म्हणून काम करत होता. फारसा गावाकडे न येणारा हा युवक चार दिवसापूर्वी चांभुर्डीत आला.
मात्र तो कोरोना बाधित असल्याचे त्यालाही माहित नव्हते. दोन तीन दिवसापूर्वी गावातील एक फौजी आपल्या कुटूंबासह जम्मू काश्मीरहून सुटीसाठी गावाला आले. पुण्याहून त्यांना गावाकडे या कोरोना बाधित युवकाने आपल्या वाहनाने आणले.
त्यामुळे तो जम्मू कश्मीर मधून आलेल्या या जवानासह दहा लोकांच्या संपर्कात आला. तसेच तो सासूरवाडीला कोळगाव येथे पत्नीकडेही गेला होता.
मंगळवार दि.७ रोजी त्याला त्रास होऊ लागल्याने तपासणी साठी श्रीगोंदा येथे गेला. त्याचा घशाचा स्राव घेऊन तपासणी केली असता तो कोरोना पॉझिटीव्ह निघाला.
त्यामुळे चांभूर्डीत कोरोनाची भिती निर्माण झाली असून तो कोरोना बाधित युवक ज्यांच्या संपर्कात आला आहे त्यांनाही तपासणीसाठी श्रीगोंदा येथे नेले असून त्यांचा अहवाल अजून आला नाहि.
त्यामुळे तहसिलदारांनी हे गाव प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले असून आरोग्य विभागाने शुक्रवार दि. १० रोजी सकाळी संपूर्ण चांभुर्डी गाव बंद केले आहे.
तहसीलद महेंद्र माळी, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन खामकर व बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी गावात भेट देऊन नागरिकांनी खबरदारीचे उपाय करण्याची गरज असल्याचे समुपदेशन केले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews