अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात 36 जणांना कोरोनाचा संसर्ग

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात 36 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. अहमदनगर शहरातील 26, तर ग्रामीण भागातील 10 रुग्णांचा यात समावेश आहे.

36 पैकी 30 अहवाल हे खाजगी प्रयोगशाळेतील आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्या लॅबमध्ये 193 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

जिल्हा आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेनुसार चार नगर शहरातील असून नगर तालुक्यातील विळद घाट आणि पाथर्डी तालुक्यातील प्रत्येकी एक कोरोना रुग्ण आहे.

खाजगी प्रयोगशाळेनुसार नगर शहरातील 22 अहवाल हे केडगाव, सावेडी, भिस्तबाग, नालेगाव, नवीपेठ, कोठी रोड, पूनममोती नगर, बोल्हेगाव भागात आढळलेल्या रुग्णांचे आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment