व्दारकामाईत भाविकांना दिसली साईंची प्रतिमा !

Ahmednagarlive24
Published:

शिर्डी :- साईबाबांच्या व्दारकामाईत पुन्हा साईबाबांचा चेहरा दिसु लागल्याने ग्रामस्थांसह हजारो भाविकांनी साईंची प्रतिमा बघण्यासाठी मोठी गर्दी केली असून साईनामाचा गजर सूरू आहे.

दरम्यान आषाढी एकादशीच्या निमित्ताने साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गुरुवारी पुर्वसंध्येला शिर्डीत मोठी गर्दी केली आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे आरती संपल्यावर साडेअकराच्या सुमारास व्दारकामाईत भिंतीवर साईबाबांचा चेहरा काही भाविकांना दिसला.

याची खबर शहरात वार्‍यासारखी पसरताच ग्रामस्थांनी व भाविकांनी द्वारकामाईत धाव घेतली. यावेळी साईबाबा संस्थानचे सुरक्षा रक्षक तसेच कर्मचारी यांनी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक जण आपापल्या मोबाईलवर बाबांचा चेहरा टिपण्यासाठी चढाओढ करत होते.

अनेकांनी सोशल मीडियावर सदर घटना व्हायरल केली असल्याने मध्यरात्रीपर्यंत भावीकांनी एकच गर्दी केली होती.दरम्यान यापूर्वीही 6 जानेवारी 2012 ला व्दारकामाईत दिसले होते. त्यानंतर 12 एप्रिल 2018 ला दिसले होते. मात्र यावेळी बाबांचा चेहरा थोडा अस्पष्ट दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment