खा.सुजय विखे म्हणतात, ‘आ.संग्राम जगताप यांच्या विरोधात प्रचार करणार नाही’

Published on -

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामाला संरक्षण खात्याने परवानगी दिली असून हे काम कोणत्याही परिस्थितीत आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल.

या कामाच्या आड जे कोणी येईल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल,असे खा. सुजय विखे यांनी स्पष्ट केले. नगरमध्ये आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या पत्रकार परिषदेस डॉ. विखे यांच्यासोबत आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित होते. उड्डाणपुलाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत संग्राम जगताप व आम्ही एकमेकांच्या विरोधात प्रचार करणार नाही.

शेवटी नगर शहरातील प्रकल्प हा महत्त्वाचा आहे. तो पूर्ण झाला पाहिजे. यासाठी आम्ही सर्व एकत्र आहोत, असेही खा. विखे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe