कोरोना रिपोर्ट न येताच ‘ते’ 23 जण घरी गेले आणि त्यातील पाच….

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढीस लागण्याचा वेग वाढला आहे. आता सोनईमध्येदेखील रुग्ण वाढू लागले आहेत. परंतु सध्या तिथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

येथील क्वारंटाईन सेंटर मध्ये असणाऱ्या 23 लोकांचा अहवाल येणे बाकी असताना त्यांनी तेथून आपला मुक्काम घरी हलवला.परंतु आता त्यातील पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान काल सोनईतील क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींपैकी तिघांचे अहवाल प्राप्त झाले असून ते संक्रमित आढळून आले आहेत.

आता प्रशासन व आरोग्य यंत्रणा या 5 जणांच्या संपर्कात आलेल्या सोनई व शिंगणापूर येथील अतिजोखमीच्या संबंधितांना विलगीकरण कक्षात नेण्यात आलेले आहे.

सोनई-शिंगणापुरातील संक्रमितांची संख्या 19 वर पोहचली असून अद्यापही 33 अहवाल प्रतिक्षेत आहेत. दरम्यान होमक्वारंटाईन असलेल्या

एका ग्रामपंचायत सदस्याने सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभाराबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करीत आरोग्य यंत्रणा कोणतीही काळजी न घेता

फक्त दिखावा करीत असल्याचे सांगून प्रशासनाचे नेवासा येथील अधिकारी सुद्धा कुठलीही गोष्ट गांभीर्याने घेत नसल्याचे म्हटले आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment