आता ‘ह्या’ तालुक्यात राबवणार मालेगाव पॅटर्न

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे.

पारनेर तालुक्यातही कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने धडक कारवाई हाती घेतली आहे. पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात तालुका वैद्यकीय व्यावसायिक संघटनेच्या सहकार्याने ४० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे.

पारनेरमध्ये आता मालेगाव पॅटर्न राबविण्यात येणार आहे. रुग्णांवर आधुनिक वैद्यक शास्त्रातील उपचारांबरोबरच मालेगाव पॅटर्न, डाॅ. उज्ज्वल कापडणीस यांचा संगीत योगा व राजयोग ध्यानधारणेद्वारे उपचार करण्यात येणार आहेत.

या सेंटरचे लोकार्पण आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे आदी उपस्थित होते.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment