संतापजनक : कोरोना रुग्णाचा ६ तास प्रवास…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- महापालिका रुग्णालयात सेवा देणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली. रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी संपर्क करूनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे रुग्णाला छत नसलेल्या टेम्पोत ठेवून रुग्णालयात नेण्यात आले, परंतु खाटा शिल्लक नसल्याचे कारण देत रुग्णालयांनी त्यांना नकार दिला.

दुपारी बारापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णाला दाखल करण्यासाठी नातेवाईकांचा आटापिटा सुरूच होता. अखेर सायंकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. मनपाच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने गुरुवारी कोरोनाची तपासणी केली.

शुक्रवारी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. प्रकृती बिघडल्याने नातेवाइकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यासाठी संपर्क केला, परंतु ती आली नाही. शेवटी नातेवाईकाने टेम्पोत रुग्णाला ठेवून रुग्णालयात नेले. प्रथम आनंद लॉन येथील मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये नेले. तेथे दीड ते दोन तास थांबायला लावल्यानंतर खाट शिल्लक नसल्याचे कारण देत दुसऱ्या रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले.

टेम्पो न्यूक्लियस रुग्णालयात नेण्यात आला. तेथेही काही खाट शिल्लक नसल्याचे कारण दिले गेले. रुग्णाच्या नातेवाईकांनी नगरसेवक कुमार वाकळे यांच्याशी संपर्क साधून ही परिस्थिती सांगितली. वाकळे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याशी संपर्क साधला.

तेथून रुग्णाला घेऊन टेम्पो जिल्हा रुग्णालयात पोहोचला. तेथेही खाट शिल्लक नसल्याचे कारण देण्यात आले. नातेवाईकांनी आमदार जगताप यांच्याशी संपर्क साधल्यानंतर दाखल करून घेण्यात आले. मनपा कर्मचारी असलेल्या रुग्णाला दाखल करण्यासाठी ही कसरत सुरू होती.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment