अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेले व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फरार असणारे मुंबई पोलीस दलातील सहायक पोनि.
पांडुरंग देवकाते याने आज अखेर श्रीगोंदा पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे तालुक्यातील थिटे सांगवी येथील असणारे देवकाते हे मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत.
त्यांच्या बाहेर असलेल्या संबंधाला पत्नी विरोध करते म्हणून पत्नीचा ते छळ करत होते त्या छळाला कंटाळून त्यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
ह्या घटनेबाबत मयत मुलीच्या घरच्यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला देवकाते यांच्याविरोधात तक्रार दिली होती.
त्या तक्रारीवरून देवकाते यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी,हुंडाबळी,कौटुंबिक छळ असे विविध कलमाखाली गुन्हा दाखल होता,
तेव्हापासून आरोपी देवकाते फरार होते अ नगर पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलीस पथके या आरोपीचा शोध घेत होते.
सहायक पो नि सतीश गावित,सहायक पो नि कांबळे यांचे पोलीस पथक देवकाते यांच्या मागावर होते. परंतु स्वतः पोलीस अधिकारी असल्यामुळे ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते परंतु आज अखेर देवकाते यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved