अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- विखे पवारांच्या वादात अनेकांनी बंगले बांधले आहेत, त्यामुळे आपल्यासाठी आम्ही एकत्र येऊ अन्यथा आमच्या वादात आपल्या टपऱ्या जायला नकोत. कर्जतकर सोपे नाहीत मला माझा कार्यकाळ पूर्ण करावयाचा आहे .
हा रस्ता माझ्या काळात झालेला नाही मी असो, आमदार असो अथवा अधिकारी सगळे नवीनच आहोत. त्यामुळे यातून एकत्र बसून चर्चा करू व योग्य तो मार्ग काढू असा शब्द खासदार सुजय विखे यांनी व्यावसायिकांच्या बैठकीत दिला.
अमरापूर बारामती या राज्य मार्गामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गाळेधारकांना विस्थापीत होण्याची वेळ आली असून अनेक लोकांवर येऊ पाहात असलेले संकट टाळण्यासाठी कर्जत मेनरोड व्यावसायिक संघटना स्थापन करून एकत्रित लढा देण्याचा निर्णय घेतला आहे,
याबाबत कर्जत शहरातील व्यावसायिक व गाळेधारकांशी खासदार डॉ .सुजय विखे पाटील यांनी संवाद साधला. यावेळी खासदार सुजय विखे यांनी व्यावसायिकांशी संवाद साधताना कर्जत जामखेड मध्ये वाहतुकीच्या अडचणीमुळेे हा प्रश्न उपस्थित होणार आहे हे निवडून येताच ओळखले होतेे
त्यामुळे खासदार होताच कर्जत जामखेड व इतर ठिकाणच्या वाहतुकी बाबत चर्चा करून पर्यायी मार्गाचे सर्वेक्षन केले असून हा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे असे सांगतानाच, कर्जत शहरातील ठराविक एकाच ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असून तो प्रश्न न सोडवता दोन्ही बाजूला रस्ता मोठा करण्यात
अर्थ काय असा प्रश्न उपस्थित करत प्रथमता कुंडी होणारा रस्ता मोकळा करावा व नंतरच रस्ता करण्यात यावा अशा सूचना देताना महाराष्ट्रात कोठेही गटारीतून पाणी वहात नसताना गटारी बांधण्याचा अट्टाहास का या गटांचा वापर लोक कचरा टाकण्यासाठी व कुत्रे बसण्यासाठी होतो
असा आक्षेप घेत च्या वरती फुटपाथ बांधण्यात यावा अशी मागणी केली याशिवाय गावात संत श्री गोदड महाराजांच्या रथ मार्गामुळे डिव्हायडर न टाकता लाईटचे खांब उभे करून सुशोभीकरण करावे अशा सूचना देताना हा रस्ता माझ्या काळा झालेला नाही अगोदरच यांनी केला आहे सध्या मी नवीन आहे
आमदार नवीन आहेत व अधिकारीही नवीन आहेत त्यामुळे आम्ही सर्व एकत्र बसून यातून मार्ग काढू असे सांगताना कर्जत करांसाठी विखे पवारांना एकत्र बसावे लागेल कर्जत कर सोपे नाहीत असे म्हणत आतापर्यंत विखे पवारांच्या वादात अनेकांनी बंगले बांधले आहेत कर्जतकरां च्या मात्र टपऱ्या जाऊ नयेत
त्यामुळे आम्हाला एकाच मार्गावर रहावे लागेल असे सूचक विधान करताना यावेळी उपस्थित उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांना नगरपंचायत माझ्याच ताब्यात आहे ना असे भर सभेत विचारून राऊत यांच्याकडून खात्रीही करून घेतली व नगरपंचायतने हा रस्ता आम्हाला मोठा नको आहे असा ठराव करून देण्याचे आदेशच दिले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved