नवी दिल्ली – बँक ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. सामान्यपणे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतील काम सकाळी १० वाजता सुरू हाेते. मात्र, अर्थ मंत्रालयाच्या बँकिंग विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व सार्वजनिक क्षेत्रातील आणि ग्रामीण बँका सकाळी ९ वाजता उघाडतील.
देशभरातील सर्व बँका एकाच वेळी सुरू व्हाव्यात या उद्देशाने केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या बँकिंग विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या विभागाने जूनमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली होती.

या बैठकीत सर्व शाखा ग्राहकांच्या सोयीनुसार सुरू करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार या बदलाला मंजुरी मिळाली आहे. आयबीएने २४ जून रोजी ग्राहकांच्या सुविधांवर स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीच्या बैठकीत बँकांच्या शाखा उघडण्यावर तीन पर्याय दिले होते.
पहिला, सकाळी ९ ते दुपारी तीन वाजेपर्यंत. दुसरा, सकाळी १० ते सायंकाळी चार वाजेपर्यंत आणि तिसरा, सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत. आयबीएने बँकांना ३१ ऑगस्टपर्यंत जिल्हा पातळीवरील ग्राहक समन्वय समितीच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यास तसेच त्यांची सूचना स्थानिक वृत्तपत्रांत देण्यास सांगितले होते.
वास्तविक ज्या ठिकाणी ग्राहकांना उशिरापर्यंत बँकिंग सेवा हवी आहे, त्या ठिकाणी आधीप्रमाणेच सकाळी १० किंवा ११ वाजता बँका सुरू ठेवण्याचा पर्याय उपलब्ध राहील.
- येत्या एका वर्षात ‘हे’ 3 शेअर्स गुंतवणूकदारांना बनवणार श्रीमंत! 66% रिटर्न मिळतील, टॉप ब्रोकरेजचा विश्वास
- सोन्याच्या किंमतीत मोठा उलटफेर ! 26 फेब्रुवारी 2025 रोजी 22, 24 अन 18 कॅरेट सोन्याच्या किंमती कशा आहेत, महाराष्ट्रातील 10 ग्रॅमचे रेट चेक करा
- Canara Bank Home Loan | बँकेकडून 20 वर्षासाठी 45 लाखांचे होम लोन घेतल्यास किती रुपयांचा ईएमआय भरावा लागणार ?
- गावातील रहिवाशी नसलेल्या ‘त्या’ नागरिकांकडे मतदान कार्ड, आधार कार्ड कसे ; तहसीलदारांनी दिला हा इशारा
- उन्हाचा तडाखा ; ‘या’ तालुक्यातील काही भागात पाणीबाणी : विहिरींनी गाठला तळ,पिके धोक्यात