अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- नगर शहरात कोरोना बाधित पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शहरातील कोरोना हॉस्पिटलवर ताण येत होता यासाठी प्रशासनाने कोविड सेंटरची संख्या वाढण्याचा निर्णय घेतला होता.
शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या पुढाकारातून केडगावमध्ये कोव्हिड सेंटर सुरू झाले होते. केडगाव उपनगरात सुरू झालेल्या कोव्हिड केअर सेंटरची दुरवस्था झाली आहे. या सेंटमध्ये नर्स नाहीत, स्वच्छतेसाठी कर्मचारी नाहीत, पिण्याचे पाणी नाही अन् ऑक्सिजन नाही. महापालिकेने तेथे सुविधा पुरविल्या नाहीत.
एक तज्ज्ञ डॉक्टर, फार्मासिस्ट आणि रोटेशननुसार किमान 5 ते 6 सिस्टर व स्वच्छतेसाठी कर्मचारी आवश्यक आहे. कोव्हिड केअर सेंटरमधील गैरसोयी दूर करा अन्यथा बाधितांसह रास्तारोको करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. महापालिकेने कोणतीच सुविधा दिलेली नाही.
कोव्हिड केअर सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरणे नाहीत. अत्यावश्यक सेवेसाठी ऑक्सिजनची सुविधा नाही. महापालिकेने करोनाबाधित रुग्णांसाठी साधी पाण्याची सुविधा केली नाही. शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक विजय पठारे, अमोल येवले, नगरसेविका सुनीता कोतकर, शांताबाई शिंदे यांनी या सुविधा उपलब्ध कराव्यात यासाठी
महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली, पण आयुक्तांनी कसल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप सातपुते यांनी केला आहे. कोव्हिड केअर सेंटरमधील गैरसोईला बाधित रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक कंटाळले असून हतबल झाले आहेत. महापालिकेने कोणत्याच सुविधा पुरविलेल्या नाहीत.
दोन दिवसांत कोव्हिड केअर सेंटरमध्ये सुविधा पुरवाव्यात अन्यथा बाधितांसह शिवसेना रास्तारोको आंदोलन करेल असा इशारा सातपुते, पठारे, शिंदे, कोतकर, येवले यांनी दिला आहे. केडगाव विभागाचे आरोग्य प्रमुख डॉ. गिरीष दळवी हे तोकड्या व्यवस्थेवरही बाधितांना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांनाही आता मर्यादा आल्या आहेत.
डॉ. दळवी हे चांगले काम करत असले तरी महापालिका प्रशासनाकडून त्यांना कोणत्याही प्रकारचे पाठबळ मिळत नाही. त्यामुळे आता शिवसेनेने पुढाकार घेत बाधितांसह रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. बाधितांसह रास्तारोको करण्याला परवानगी मागणारे पत्र कलेक्टरांना देण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved