शुभांगी पोटे व त्यांच्या पतीस अपात्र ठरवण्याची मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- नगराध्यक्ष शुभांगी मनोहर पोटे आणि त्यांचे पती नगरसेवक मनोहर रामदास पोटे यांनी २०१८ मध्ये झालेली नगरपालिकेची निवडणूक काँग्रेसच्या पंजा चिन्हावर लढवून जिंकली.

ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मनोहर पोटे यांनी भाजपत प्रवेश करून पक्षाचे उमेदवार आमदार बबनराव पाचपुते यांचा प्रचार केला.

राज्यात महाआघाडी सरकार स्थापन झाल्यावर त्यांनी पुन्हा काँग्रेसचे काम सुरू केले. वारंवार पक्ष बदलण्याच्या कृतीमुळे त्यांना महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ च्या कलम (३)(१) (अ) प्रमाणे अपात्र ठरवावे

आणि अर्हतेच्या तारखेपासून सहा वर्षांपर्यंत त्यांना अध्यक्ष, तसेच नगरसेवक राहण्यास अपात्र ठरवावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.

त्याची सुनावणी ७ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता आहे, अशी माहिती अर्जदार आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी गुरुवारी दिली. भोस म्हणाले, पोटे हे पक्षांतर बंदीच्या कायद्याची पायमल्ली करत आहेत,

म्हणून मी, ॲड. ऋषिकेश गायकवाड, सतीश बोरुडे आणि अख्तर शेख अशा चौघांनी त्यांना अपात्र ठरवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दावा दाखल केला आहे.

नगरपालिकेच्या निवडणुकीपासून आतापर्यंतच्या त्यांच्या वारंवार पक्ष बदलण्याच्या कृतीचे पुरावेही आम्ही सादर केले आहेत. अशा वारंवार पक्ष बदलणाऱ्या पदाधिकाऱ्यांना यापूर्वी अपात्र ठरवल्याचे दाखलेही आम्ही नमूद केले आहेत.

त्यामुळे नगराध्यक्ष शुभांगी पोटे आणि त्यांचे पती नगरसेवक मनोहर पोटे यांना कायद्यातील तरतुदीनुसार अपात्र ठरवण्याची आमची मागणी आहे, असे भोस यांनी सांगितले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment