अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- आरोग्य विभागाच्या अनास्थेचा बळी ठरलेल्या पत्रकार पांडुरंग रायकरांना न्याय मिळवा.
मृत्यूस कारणीभूत असलेल्या दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी आश्वी प्रेस क्लब व महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाने आश्वीचे पोलिस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांना निवेदन दिले.
सीताराम चांडे, संजय गायकवाड, योगेश रातडीया, रवींद्र बालोटे, अनिल शेळके, संकेत कचेरिया आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते.
रायकर यांना श्रध्दांजली वाहत आरोग्य विभागाच्या अनास्थेचा निषेध करण्यात आला. रायकर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोपरगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या रुग्णालयाने पैशांसाठी अडवणूक केली. पुण्यातही वेळेत उपचार झाले नाहीत. आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे पत्रकाराला जीव गमवावा लागला. दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved