….म्हणून गुरुजींनी धाडले शिक्षण मंत्र्यांना पत्र

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  प्रत्येकाच्या आयुष्याच्या जडणघडणीत शिक्षक हे व्यक्तिमत्व नेहमीच आदरस्थानी राहिले आहे. मात्र आज शिक्षणदिन असून आजच्याच दिवशी गुरुजींना आपल्या मागण्यांसाठी शासन दरबारी पत्र धाडवे लागले आहे.

शिक्षकांचे प्रश्‍न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी शिक्षकदिनी शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर, प्राध्यापकेतर कर्मचारी काँग्रेस महासंघ व कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना निवेदन पाठविण्यात आले. तसेच आमदार सुधिर तांबे यांना देखील या मागणीचे निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी प्रसाद शिंदे, राहुल मोरे, मार्टीन पारधे, अतुल सारसर, रविंद्र आगलावे, सिराज खान, ललित वाकचौरे आदि शिक्षक उपस्थित होते. शिक्षकांच्या नशिबी असणारा हा वनवास संपवावा, शिक्षकांना सन्मानाने जिवन जगण्याचा अधिकार बहाल करावा, अनुदानाचा प्रश्‍न मार्गी लावून शिक्षक दिना निमित्तानं शासनाने दखल घ्यावी अशी मागणी प्रसाद शिंदे यांनी केली.

“या आहेत शिक्षकांच्या मागण्या” अहमदनगर जिल्ह्यातील 20 टक्के अनुदान प्राप्त शाळांना घोषित, अघोषित खाजगी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदानास पात्र घोषित करावे, पात्र घोषित शाळांना निधीची तरतूद करावी व 20 टक्के अनुदानित शाळांना प्रचलित प्रमाणे वाढीव अनुदान मिळावे,

जिल्हा शासन व शिक्षक समन्वय समिती नेमावी, जुनी पेन्शन योजना लागु करावी, निवृत्त शिक्षकांना पेन्शन अदा करावी, आत्महत्या केलेल्या शिक्षकांच्या कुटूंबाला आर्थिक मदत द्यावी, शिक्षकांचा कोरोना विमा काढावा, शिक्षण सेवकांचे मानधन वाढवावे, संच मान्यता पोर्टल सुरु करावे,

घोषित 20 टक्के अनुदानीत शाळांचा निधि वितरीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री महोदयांनी शिक्षकांचे शिष्टमंडळ समोर कॅबिनेट बैठकीत आपला प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले. तेंव्हापासून आजवर झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीकडे सर्व शिक्षक बांधव मोठ्या आशेने अनुदानाचा प्रश्‍न निकाली निघेल या आशेने पाहत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment