अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- नेवासे तालुक्यातील नेवासे फाटा ते बेलपिंपळगाव फाटा दरम्यान प्रवास करत असताना बोलेरोमधील प्रवाशाला गाडीतील लोकांनी मारहाण करून ४० हजार ७०० रुपये रोख व २ हजार रुपये किमतीचा मोबाइल असा एकूण ४२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना रविवारी सकाळी घडली.
याप्रकरणी श्रीरामपूर एसटी आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेले रतन मानसिंग आगारे (मु.पो. तोंडापूर, ता. जामनेर, जि. जळगाव) हल्ली मुक्काम निलकंठ गार्डन प्लॉट नंबर ३०५ पूर्णवादनगर, वॉर्ड नंबर ७ श्रीरामपूर यांनी नेवासे
पोलिसात फिर्याद दिली. श्रीरामपूर येथून ते भाचा संतोष शेणपड बारवाल, रा. कोधा, ता.भोकरदन यांच्याकडून पैसे आणण्यासाठी गेले होते. भाचा संतोष शेणपड बारवाल याने त्यांना घराचा हप्ता भरण्यासाठी ४० हजार रुपये दिले.
ते पैसे घेऊन ते दोनच्या सुमारास श्रीरामपूरकडे पैसे घेऊन निघाले. त्यानंतर नेवासे फाटा येथून ते बोलेरो जीपमध्ये बसले. श्रीरामपूर रोडने जाताना गाडीतील व्यक्तींनी साडेदहाच्या सुमारास नेवासे तालुक्यातील
बेलपिंपळगाव शिवारातील गाडीतील तिघांनी मारहाण करून मोबाइल काढला व पॅन्टच्या खिशातील ७०० रुपये व ४० हजार रुपये काढून घेतले. त्यांना पुन्हा गाडीतून खाली सोडून निघून गेले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved