अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- कंगना राणावत यांनी मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच गदारोळ सुरू आहे. कंगनाच्या वक्तव्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे.
त्यातच आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगना राणावत यांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
सुशांतसिंह प्रकरणात सातत्याने बोलणाऱ्या कंगनाने मुंबई पोलिसांवर आरोप करीत त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कंगनाच्या या वक्तव्याने मोठा गदारोळ सुरू आहे.
शिवसेना, काँग्रेस, मनसेसह अनेकजण कंगनावर जोरदार टीका करीत आहे. दरम्यान मुंबई आणि महाराष्ट्र बाबत कंगनाने केलेल्या विधानाबाबत कंगना जर माफी मागत असेल तर मी माफी मागण्याबाबत विचार करेल,
असे राऊत यांनी पत्रकारांना सांगितलं आहे. संजय राऊत म्हणाले की कंगनामध्ये हिमंत असेल तर तिने अहमदाबादची तुलना पाकिस्तानबरोबर करून दाखवावी.
मी कंगनाबाबत केलेल्या विधानावर ठाम असल्याचं राऊत यांनी सांगितलं. कंगना राणावत यांनी शनिवारी टि्वट केलं होतं. आपल्या टि्वटमध्ये तिने सांगितलं होतं की 2008 मध्ये एका चित्रपटमाफीयानं मला मनोरूग्ण म्हटलं होतं.
एवढेच नाही तर 2006 मध्ये त्यांनी मला चुडैल म्हटलं. आणि 2020 मध्ये हरामखोर मुलगी म्हटलं आहे. सुशांतसिंह राजपूत यांच्या हत्येनंतर मला मुंबईत असुरक्षित वाटतं, असं मी म्हटल्यामुळं ते माझ्यासोबत असं वागत आहेत.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved