अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज नव्या १६४ बाधितांची रुग्णसंख्येत भर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार ६७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.०९ टक्के इतके झाले आहे. 

दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३५८९ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ८३, पाथर्डी ०८, नगर ग्रामीण १०, श्रीरामपूर ०२, नेवासा ०३, श्रीगोंदा ०१, पारनेर ०१, राहुरी ०२, शेवगाव ४५, कोपरगाव ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ५२४ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २०१, संगमनेर २२, राहाता ४०, पाथर्डी २१, नगर ग्रा.३८, श्रीरामपूर ३६, कॅंटोन्मेंट १७,  नेवासा ०६, श्रीगोंदा ०५, पारनेर १५, अकोले १५, राहुरी २६, शेवगाव १७,  कोपरगाव २४, जामखेड १४, कर्जत २०, मिलिटरी हॉस्पिटल ०६ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या: २२६७४
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:३५८९
  • मृत्यू:३८३
  • एकूण रूग्ण संख्या:२६६४६

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment