आधी मुद्दा नीट समजून घ्या मग टीका करा ; आ. रोहित पवारांच सडेतोड प्रतिउत्तर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- सध्या राज्य संकटात आहे. राज्यावर संकट असतानाही राजकारण केलं जात असेल तर ते दुर्दैव म्हणावं लागेल. आज राज्यात कोरोनाचं संकट असताना विरोधी पक्ष प्रत्येक गोष्टीचं राजकारण करत आहे.

परंतु असली टीका करताना निदान विषय काय आहे हे तर समजून घ्या आणि मग टीका करा असे सडेतोड प्रतिउत्तर आ. पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले. व्यवसाय सुलभतेच्या क्रमवारीत महाराष्ट्र १३ व्या क्रमांकावर असल्याचं निमित्त करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीका केली होती.

याला प्रतिउत्तर देताना आ. पवार बोलत होते. ‘टीका करायला एखादा मुद्दा शोधणं आणि टीका करणं हा एकच अजेंडा सध्या विरोधी पक्षाचा दिसतोय. व्यवसाय सुलभतेची जाहीर झालेली क्रमवारी हे याचंच उदाहरण आहे. यावर चंद्रकांत पाटलांनी फेसबुकवर विस्तृत पोस्ट लिहून राज्य सरकारवर टीका केली.

मुळात व्यवसाय सुलभतेचं (Ease of Doing Buissness) जाहीर झालेलं रँकिंग २०१९ साठीचं आहे. दुसरं म्हणजे २०१६ मध्ये या रँकिंगमध्ये महाराष्ट्र १० व्या क्रमांकावर होता, तर २०१७-१८ मधील रँकिंग मध्ये १३ व्या क्रमांकावर घसरला आणि २०१९ मध्येही हा १३ वा क्रमांक कायम आहे.

आता यामध्ये महाविकास आघाडी सरकारचा काय संबंध? आणि सबंध असेल तर याला मागचे सरकार जबाबदार नाही का? त्यात आपण कमी पडलो तर नाही ना, याचाही विचार विरोधी पक्षाच्या अध्यक्षांनी करायला हवा होता. टीका करताना त्या विषयाला समजून घ्यायला हवं,

फक्त करायची म्हणून काहीही टीका करायची नसते,’ असा टोलाही रोहित यांनी हाणला आहे. तसेच आपण कुठे मागे पडतोय. पण एक सामान्य नागरिक म्हणून आपण का मागे पडलो? याचं उत्तर शोधण्याचा आणि भविष्यात सुधारणा करण्यासाठी काही करता येईल का, याचा विचार करणं आवश्यक आहे.

फक्त विरोधासाठी विरोध करणे या भूमिकेने राज्याचं हित साधणार नाही, त्यामुळे राज्याच्या भल्याच्या दृष्टीने विरोधी पक्षाने विधायक टीका करण्यावर भर द्यायला हवा,’ अशी अपेक्षाही रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment