अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर शहरासह जिल्ह्यात ग्रामीण भागात गुरुवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास धोधो पाऊस पडला. या पावसाने शहरातील सखल भागात पाणीच पाणी साचले होते.
पावसामुळे रस्त्यावर शुकशुकाट निर्माण झाला होता. दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. यामुळे उकाडाही जाणवत होता. दरम्यान ५ नंतर वाजेपर्यंत काळे ढग दाटून आले होते.
त्यानंतर शहर व परिसरात जोरदार पावसाला सुरूवात झाली. सुमारे १ तास धोधो पाऊस पडला. यामुळे शहरातील दिल्लीगेट, चितळीरोड, नालेगाव, सावेडी, प्रोफेसर चौकात पाणीच पाणी साचले होते.
गेल्या काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात सायंकाळी ते रात्रीच्य वेळी पाऊस झोडपून काढत आहे. यामुळे नगकर चांगल्याच त्रासाला सामोरे जात आहेत.
यासह ग्रामीण भागात दररोज होणार्या पावसामुळे खरीप हंगामी काढण्यास आलेली पिके सडली असून रब्बी हंगामासाठी शेत तयार करण्यास वापसा नसल्याने शेतकर्यांची अडचण झाली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved