अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- कोविड रुग्णांना योग्य ती सेवा मिळत नसल्याचा व्हिडिओ अहमदनगर शहरातील एका मोठ्या हॉस्पिटलचा असल्याचे सांगून समाज माध्यमांवर व्हायरल करणे चांगलेच महागात पडले आहे.
व्हाटसअॅपमधील एका ्ग्रुपच्या अॅडमिनवर गुन्हा दाखल झाला आहे. अभिजीत चिपा, असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
तारकपूर येथील एक मोठे हॉस्पिटलमधील प्रकार असल्याचे सांगून तेथील कोविड रुग्णांना योग्यपद्धतीने वागणूक दिली जात नसल्याचे व्हिडिओ व्हाटस्अॅपच्या एका ग्रुपवरून व्हायरल करण्यात आला आहे.
वेगाने व्हायरल झालेल्या या व्हिडिओची माहिती संबंधित हॉस्पिटल प्रशासनाला मिळाली. त्याची तपासणी केल्यावर हा व्हिडिओ आपल्या हॉस्पिटलचा नसून तो फेक आहे.
परंतु त्या व्हिडिओखालील मजकुराने हॉस्पिटलची बदनामी होत आहे. त्यानुसार हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी संजीव दायमा यांनी तोफखाना पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
पोलिसांनी त्याची दखल घेत व्हॉटस्अॅपवरील सम्राट गल्ली मित्र मंडळ या ग्रुपच्या अॅडमिन अभिजीत चिपा याच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved