तुम्हाला सारखा राग येतो? तर हे नक्की वाचा…

Ahmednagarlive24
Published:

राग किंवा क्रोध आपल्याला मारक ठरतो. रागावर नियंत्रण मिळवलं नाही तर बरेच विकार जडू शकतात. हृदयविकार, उच्च रक्तदाबासारखे विकार रागामुळे बळावू शकतात. क्रोधामुळे बायपोलर डिसऑर्डरसारखा गंभीर विकार जडू शकतो.

रागावर नियंत्रण न मिळवल्याने वैयक्तिक नातेसंबंधांवर विपरित परिणाम होतो. अशा असंख्य दुष्परिणामांमुळे रागावर नियंत्रण मिळवणं गरजेचं होऊन बसतं. यासाठी काही उपाय करता येतील. राग ही एक भावना आहे. रागला अनेक गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. आपल्याशी कोणी चुकीचं वागलं, मनासारखं घडलं नाही तर राग येतो.

खूप संताप येतो. रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही अगदी सहजसोपे उपाय करू शकता. यामुळे तुमचं सर्वांगिण आयुष्य उत्तम राहील. . राग आल्यावर कोणाशी तरी बोला. मनातल्या भावनांना वाट करून द्या. मनात काहीही ठेऊ नका.

जवळच्या व्यक्तीशी बोलल्यानंतर तुम्हाला शांत वाटेल. बोलल्यामुळे रागाचं प्रमाण वाढत नाही उलट भावनिक आणि मानसिक आधार मिळाल्याने हलकं वाटतं. राग येतोय असं वाटू लागल्यावर १० ते शून्य हे आकडे उलट मोजा. डोळे बंद करून आकडे मोजायला सुरुवात करा. यामुळे राग कमी होईल. तुम्हाला सारासार विचार करायला वेळ मिळेल.

अनेकदा आपण कोणत्याही कारणाशिवाय भांडतो. विशिष्ट घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया देतो. नेमकं काय घडलंय हे आपल्याला माहीतच नसतं. सर्वात आधी घटनेमागचं कारण जाणून घ्यायला हवं. एखाद्या माणसाच्या वागणुकीचा आढावा घ्यायला हवा. यामुळे तुम्ही रागावर नियंत्रण मिळवू शकाल. प्रखर प्रकाशामुळे भावनांचा अतिरेक होतो.

प्रकाश आपल्या भावभावनांवर परिणाम करत असतो. त्यामुळे राग येत असेल तर घरातले दिवे बंद करा. यामुळे तुम्हाला मन:शांती लाभेल. रागावर नियंत्रण मिळवताना ही बाब उपयुक्त ठरू शकेल. चर्चेदरम्यान वादावादी झाली आणि रागाचा पारा चढू लागला तर त्या चर्चेतून अंग काढून घ्या. मतंमतांतरं असली तरी त्याचं रुपांतर रागात होऊ देऊ नका.

दोन मिनिटं डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या. यामुळे तुम्हाला बरं वाटेल आणि डोकं शांत होईल. राग येत असेल तर हातात कागद घेऊन चित्र काढायला सुरुवात करा. आवडीच्या विषयावर लिहा. यामुळे तुमचं मन विचलित होईल. मेडिटेशन, ध्यानधारणेमुळे आराम मिळतो. नियमित मेडिटेशन करा. दीर्घ श्वास घेऊन सोडताना त्यासोबत रागाची भावनाही कमी होत असते.

काही गोष्टी सोडून द्यायला आणि विसरून जायला शिका. समोरच्याला माफ करून टाका. दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वत:ला देऊ नका. रागामुळे आपण स्वत:चंच नुकसान करत असतो, हे कायम लक्षात ठेवा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment