अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात निघोज कुंडामध्ये खून करून टाकून देण्यात आलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली असून या हत्येचे रहस्यही उलगडले आहे.
बाहेरख्यालीपणा तसेच व्यसनधिनेला कंटाळून मुलानेच बापाचा गळा दाबून खून केला. व मृतहेद निघोज हददीमधील कुकडी नदीपात्रात टाकून दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
प्रतिक सतिष कोहकडे व रा. कारेगाव ता. शिरूर जि. पुणे याने वडील सतिष कोहकडे यांचा खून केल्यामुुळे त्याच्यासह त्याच्या चार मित्रांविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सतिष कोहकडे हे व्यसनानिध होते. त्यांना बाहेरख्यालीपनाचा नाद होता. त्यातच त्यांच्या कमाईचे पैसे जात असल्याने कुटूंबाची हेळसांड होत होती. वारंवार सांगूनही वडील ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे मुलाने मित्रांच्या मदतीने वडीलांचा गळा दाबून खून केला.
प्रतिक याचे वडील रात्रीच्या वेळी घरी झोपलेले असताना प्रतिक व त्याचे मित्र घरी गेले. झोेपलेल्या वडीलांना उठविल्यानंतर एकाने ताेंंड दाबले तर दुस-याने कमरेच्या पटटयाने गळा आवळला.
त्यातच सतिश यांचा मृत्यू झाला. अंडरवेअर व बनियनवर झोपलेले सतिश कोहकडे हे खून करण्यात आला त्यावेळी दारूच्या नशेत होते.खून करण्यात आल्यानंतर घरामागील गोठयात असलेल्या धान्याच्या कोठीत सतिश यांचा मृतदेह कोंबण्यात आला.
आल्टो कारमध्ये मृतदेह कोंबलेला मृतदेह कुकडी नदीमध्ये टाकून देण्यात आला. खुन करण्यासाठी व मृतदेह नदीपात्रात टाकून देण्यासाठी प्रतिक याच्या चार मित्रांनी त्यास मदत केली.
मृतदेह नदीपात्रात टाकून देण्यात आल्यानंतर दोन दिवस मृतदेह नेण्यासाठी वापरण्यात आलेली अल्टो कार घरीच ठेवण्यात आली. नंतर सरदवाडी येथील करडे घाटात ती ढकलून देण्यात आली व अपघाताच बनाव करण्यात आला.
शिरूर पोलिस ठाण्यात सतिश कोहकडे हे हारविल्याची फिर्याद देण्यात आली होती. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला होता. परंतू धागेदोरे मात्र हाती लागत नव्हते.
करडे घाटातील बेवारस कार सापडल्यानंतर मात्र घटनेची उकल होउ लागली. मुलगा प्रतिक या पोलिसी खाक्या दाखविण्यात आल्यानंतर त्याने सर्व घटनाक्रमाचा खुलासा केला. व चार जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved