अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- कोरोनाची वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. तरीही कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे.
यातच जिल्ह्यातील राहूरी तालुक्यात कोरोना रुग्णांची सातत्याने वाढ होत असल्याने 50 बेडचे कोविड हॉस्पिटल तातडीने सुरू करावी अशी मागणी युवक कॉंग्रेसचे समनव्यक राजेंद्र बोरुडे व कार्यकर्त्यांनी केली आहे.
या मागणीसंदर्भात युवक काँग्रेसने तालुक्यातील तहसीलदार फसीयोद्दीन शेख यांची भेट घेत सदर मागणीचे निवदेन त्यांना दिले आहे. निवेदनात म्हंटले आहे कि, राहुरी तालुका हा नगर जिल्ह्यातील मोठ्या लोकसंख्येचा तालुका आहे.
तालुक्यात कोरानाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला असून तालुक्यातील कोरोनाची परीस्थिती गंभीर होत चालली आहे. बाधित रुग्णांना काही त्रास होत नसेल तर विद्यापीठ व राहुरी कारखाना येथे अँडमिट केले जाते.
व ज्यांना त्रास होतो.त्यांना अहमदनगर च्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठवले जाते व काहींना श्रीरामपूर येथे देखील पाठवले जात आहे.
वाढते कोरोनाबाधित पाहता तालुक्यात देखील 50 बेडचे कोविड हॉस्पिटल तातडीने सुरू करावे अशी मागणी बोरुडे यांनी केली.
या प्रश्नी लवकरच महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात , आ. लहु कानडे व प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे पाटील यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे बोरुडे यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved