संतापजनक : अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ओढण्याचा प्रयत्न, वाचा कुठे घडली ही घटना ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जलालपुर भागात एका १६ वर्ष वयाच्या विद्यार्थिनीस रा.धालवडी हिला पळवून आणून तेथील घरात कोंडून ठेवून संगनमताने वेश्या व्यवसाय करण्यासाठी बळजबरी करुन शारीरिक व मानसिक त्रास देण्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.

विशेष म्हणजे हे कृत्य करणारे आरोपी तिचे नातेवाईक आहेत. या त्रासातून अल्पवयीन विद्यार्थिनीने कपाशीवर मारण्याचे विषारी औषध पिले.

पिडीत विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून आरोपी सुंदरा पाटोळे, सावत्र भाऊ, मामू पाटोळे मावस भाऊ, तानाजी दिगंबर रणदिवे, मामा, आदेश रणदिवे मेव्हणा,

(सर्व रा. फौंडशिरस, ता.माळशिरस, जि. सोलापूर) बनिता (बहिण) ग. टाकळोकडेवळी, सुवर्णा (बहिण), रविंद्र बाळू कांबळे, रा. केडगाव या सर्वाविरुद्ध कर्जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment