अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधूनही कोरोनाही धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे.
तसेच अकोले तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आठ दिवसात पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी अकोले तालुक्याचा दौरा करून पाऊल न उचलल्यास तहसील कार्यालयासमोर आत्मक्लेश करणार असल्याचा इशारा डॉ. अजित नवले व विनय सावंत यांनी दिला.
शासकीय विश्रामगृह अकोले येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. अजित नवले म्हणाले की,कोरोनाचे रुग्ण आढळून आले की,दोन चार कार्यकर्ते बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेतात.
त्यामध्ये गोर गरीब जनतेचे हाल होत असून त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न तयार होत आहे.मुळात बंद हा कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी एकमेव पर्याय नाही.कोरोनाच्या टेस्ट वाढविणे गरजेचे आहे,कोव्हीड सेंटर अथवा कोव्हीड हॉस्पिटल उभारणे गरजेचे आहे. तालुक्यातील कोव्हीड सेंटरची अवस्था फार दयनीय आहे.
यामुळे आदिवासी भागातील रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पतसंस्था,सोसायटी,दूध डेअरी,उद्योजक,व्यावसायिक,सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी व विरोधक यांनी पुढे येऊन कोव्हीड सेंटर सुरू करावे. तसेच अकोले येथे उपजिल्हा रुग्णालय, राजूर येथे चांगल्या सुविधा असलेले रुग्णालय उभारणे गरजेचे आहे.
त्यासाठी आर्थिक योगदान द्यावे असे आवाहन डॉ.अजित नवले यांनी केले. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी येत्या आठ दिवसात दौरा केला नाही तर आम्ही आत्मक्लेश करू असा इशारा डॉ.अजित नवले व विनय सावंत यांनी दिला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved