अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- अर्बन बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांना आज दुपारी अर्बन बँकेच्या कार्यालयातील परिसरात मारहाण झाली.
या मारहाणी संदर्भात तक्रार देण्यासाठी गांधी हे कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचले होते. तिथे तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते. दरम्यान राजेंद्र गांधी यांना कोणत्या कारणावरून मारहाण झाली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
अर्बन बँकेतील गैरव्यवहारासंदर्भात गांधी हे पाठपुरावा करत आहेत. त्यामुुुुळे नगर शहरासह बँकिंग क्षेत्रातील तज्ञांमध्ये गांधी यांना झालेल्या मारहाणीबाबत तर्क लढविले जात आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी कि, राजेंद्र गांधी हे आज दुपारी नगर अर्बन बँकेमध्ये आले होते. या ठिकाणी त्यांना मारहाण झाली. घटनेनंतर बँकेमध्ये सर्वत्र पळापळ झाली.
गांधी यांनी हा मारहाणीचा निषेध करत तक्रारीसाठी कोतवाली पोलीस ठाणे गाठले. नगर अर्बन बँकेच्या कर्ज वाटपातील गैरव्यवहाराबाबत गांधी यांनी आरबीआयकडे तक्रारी केलेल्या आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved