श्रीरामपूर : शहरातील भूमिगत गटार योजनेतील सांडपाणी प्रकल्पात सुमारे १३ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी श्रीरामपूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांच्यासह पाच जण व दोन ठेकेदार संस्थांविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी नगराध्यक्षा राजश्री ससाणे, तत्कालिन मुख्याधिकारी सुमंत गणपतराव मोरे, त्यानंतरचे तत्कालिन मुख्याधिकारी संतोष महादेव खांडेकर, बांधकाम अभियंता सूर्यकांत मोहन गवळी, तत्कालिन बांधकाम अभियंता राजेंद्र विजय सुतावणे यांच्यासह ठेकेदार संस्था लक्ष्मी सिव्हील इंजिनियर्स व दहासहस्त्र सोल्युशन प्रा. लि. यांचा समावेश आहे.

याबाबत केतन खोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २०१५-१६ या आर्थिक वर्षात श्रीरामपूर नगरपरिषदेचे श्रीरामपूर शहर भुयारी गटार योजनेतील दक्षिणेकडील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व पंपींग स्टेशनसाठी जागा उपलब्ध नसताना तसेच भुयारी गटार योजनेतील उत्तरेकडील एस.टी.पी.चे सिव्हील वर्क पूर्ण होण्याअगोदरच आवश्यक असणाऱ्या मेकॅनिकल व इले्ट्रिरकल कामाची बिले अदा करून श्रीरामपूरची जनता व शासनाची फसवणूक करून,
खोटे व बनावट बिले बनवून सुमारे १३ कोटी ९३ लाख ८४ हजार ९५४ रुपयांचा अपहार केला आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- नोकरीवर असणाऱ्या लोकांना घर खरेदी करणे फायद्याचे ठरणार की भाड्याने राहणे ? तज्ञ काय सांगतात….
- 1 नोव्हेंबर 2025 पासून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अन केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार नवीन नियम !
- वंदे भारतने प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! मुंबई आणि पुण्यातून धावणाऱ्या ‘या’ 2 वंदे भारतला नवीन थांबा मंजूर !
- Maruti Suzuki Victoris चे टॉप मॉडेल EMI वर खरेदी करण्यासाठी किती रुपये डाऊनपेमेंट करावे लागणार? वाचा सविस्तर
- रेल्वे प्रवाशांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी! रेल्वे मंत्रालयाकडून वंदे भारत स्लीपर ट्रेनला मंजुरी, कधी धावणार नवीन ट्रेन ?













