अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- पोलीस उपअधीक्षक संजय सातव व पोलीस कर्मचारी बळारीम काकडे हे गुंडाच्या चाकूहल्ल्यात जखमी झाले आहेत. कर्जत शहरात ही आज घटना घडली.विलास अबलूक्या काळे असे हल्लेखोराचे नाव आहे.
विलास हा बँकेत शिरून शस्त्रास्त्राचा धाक दाखवित होता. बँकेतील तिजोरीच्या चाव्या मागत होत्या. त्याने एक तास बँकेत आलेले नागरिक आणि कर्मचायांना वेठीस धरले होते.
पोलीस उपअधीक्षक सातव यांना याची माहिती मिळाली. पोलीस कर्मचारी काकडे यांना बरोबर घेऊन बँकेजवळील परिसरात पोहोचले. विलास हा तेथील परिसरात हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करत होता.
सातव यांनी विलास याला शरण येण्याच्या सूचना केल्या. परंतु त्याने सातव यांच्या अंगावर हल्ला चढविला. पोलीस कर्मचारी काकडे आणि स्थानिक नागरिक रोहिदास आढाव यांनी विलास याला पकडण्यास मदत केली.
या झडापटीत विलास याने हातातील शस्त्राचे वार केले. त्यात उपअधीक्षक सातव व पोलीस कर्मचारी काकडे हे जखमी झाले. दोघे जखमी झाले असतानाही त्यांनी विलास काळे याला सोडले नाही. भर रस्त्यावर हा प्रकार घडला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved