‘ह्या’ कारणामुळे झाला राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यावर गुन्हा दाखल !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी मारहाण केल्याची फिर्याद खडकी बुद्रूक येथील ग्रामपंचायत कार्यालयातील शिपाई रामदास लखा बांडे यांनी शुक्रवारी राजूर पोलिस ठाण्यात नोंदवली. 

तक्रारीत म्हटले आहे, १७ सप्टेंबरला मी दत्त मंदिराजवळून जात असताना आमदार डॉ. लहामटे यांची गाडी कट मारून गेली. आम्हाला वाटले, बाहेरून पर्यटक आले आहेत, 

म्हणून गाडी हळू चालवा, असे मी ओरडून सांगितले. त्याचा राग येऊन आमदार डॉ. लहामटे गाडी थांबवून खाली उतरले. ‘मला ओळखले का?’ असे म्हणत त्यांनी माझ्या पोटात व छातीत लाथा मारून शिवीगाळ केली. 

नंतर गाडीत बसून निघून गेले. यावेळी त्यांच्यासोबत मनोहर सखाराम भांगरे होते. यासंदर्भात राजूर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दखल केला आहे. 

या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले असून भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करून चौकशीची मागणी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment