अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वरुणराजाने चांगलीच हजेरी लावलेली आहे.
ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदी नाले, ओढे यांना पूर आला आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात पावसाने धुमाकूळ घेतला आहे.
तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली अतिवृष्टी. ओढ्या- नाल्यांचे पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहे.
यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून चालला आहे. तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी आंबी येथे समक्ष पाहणी करून महसूल विभागाला अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचा आदेश दिला.
त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तालुक्यात बाजरी, सोयाबीन पिके काढणीला आले. परंतु, अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले.
ओढे- नाले तुडुंब भरून वाहत असल्याने, त्यांचे पाणी शेतात शिरले. यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. आंबी- देवळाली प्रवरा रस्ता, तांभेरे- सोनगाव- सात्रळ रस्ता पाण्याखाली गेला.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. फळबागांचे यापूर्वी पंचनामे करण्यात आले. परंतु, त्यांना अद्याप मदत जाहीर झालेली नाही.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved