अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी १७ जणांचा मृत्यू झाला आहे. बळींची संख्या ५८६ झाली आहे. दिवसभरात जिल्ह्यात नवे ७०३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ३६ हजार ११५ झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपासून शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७०३ ने वाढ झाली.
जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेमध्ये १११, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२२ आणि अँटीजेन चाचणीत ३७० रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४८, संगमनेर ३, नगर ग्रामीण १२, श्रीरामपूर १, कॅंटोन्मेंट ०४, नेवासे २, श्रीगोंदे १०, पारनेर १, अकोले १, राहुरी ४, शेवगाव २०,
जामखेड ३ आणि मिलिटरी हॉस्पिटल २ अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २२२ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.
यात मनपा ६२, संगमनेर १२, राहाता १६, पाथर्डी ११, नगर ग्रामीण १४, श्रीरामपुर १४, नेवासे १३, श्रीगोंदे ४, पारनेर १२, अकोले ४, राहुरी ३७,
शेवगाव ३, कोपरगाव ३, जामखेड १६ आणि कर्जत १ अशा रुग्णांचा समावेश आहे.अँटीजेन चाचणीत ३७० जण बाधित आढळून आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved