तुमचा एक गुंठाही जाऊन देणार नाही. मी स्वत: रणगाड्याखाली झोपेल : आ. निलेश लंके

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- अनेक वर्षांपासून साकळाई पाणी योजनेचे काम आपण फक्त निवडणुकीपुरते ऐकत आहोत. निवडणुका आल्या की पुढारी गाडी, भोंगा व माईक हातात घेऊन गावोगावी सभा, बैठका घेऊन साकळाई पाणी योजनेचे काम पूर्ण झाले पाहिजे, असे सांगत असतात.

निवडणुका संपल्या की जनतेला पुन्हा वाऱ्यावर सोडून दिले जाते. निवडणुका आल्या की साकळाई पाणी योजना आठवते. आता पुढाऱ्यांचा साकळाई पाणी योजनेचा धंदा बंद होणार आहे. साकळाई पाणी योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. त्या योजनेच्या पाठपुराव्याचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वाळकीत ही योजना पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले. महाराष्ट्राची ताकत शरद पवार आहे. के. के. रेंजमधील जमीन संदर्भात त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याकडे हा प्रश्न घेऊन गेल्यानंतर त्यांनी लगेच आश्वासन दिले की, संरक्षण खाते, शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करणार नाही.

मध्यंतरी काही पुढारी गावो गावी जाऊन के. के. रेंजबाबत शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल, असे सांगत आहे. परंतु आम्ही तुमचा एक गुंठाही जाऊन देणार नाही. मी स्वत: रणगाड्याखाली झोपेल असे प्रतिपादन आ. निलेश लंके यांनी केले.

नगर तालुक्‍यातील वाकोडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आ. निलेश लंके यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सरपंच हरिभाऊ कर्डिले, उपसरपंच अमोल तोडमल, मंजाबापू मोढवे, भाऊसाहेब मोढवे, सचिन कराळे ,जगन्नाथ मोढवे, विजय कराळे, अंकुश गवळी, माणिक गवळी, मुरलीधर गोरे, मल्हारी मोढवे, बबन मोढवे,

हौशाबापू गवळी, प्रल्हाद गवळी, प्रदीप लुंकड, अमोल गोरे, आदिनाथ कराळे, सचिन तोडमल, दादा सुंबे, सचिन पठारे , सचिन गवारे,बाळासाहेब लंके, सचिन निमसे, सुनील कोकरे, गणपत शिंदे, दिलीप लांडगे, मारुती आमले आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. लंके म्हणाले की, आपल्यावर कोरोनाचे महाभयंकर संकट आले आहे.

यामध्ये सर्वांनी सेवाभाव दाखवून जनतेला सहकार्य करावे. राज्यात सर्वात मोठे कोविड सेंटर सुरु केले आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अन्नदानही केले आहे. पुढील काळामध्ये मतदारसंघाच्या विकासाला चालना देणार आहे. विविध योजनेतून मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मतदारसंघाचा मी आमदार नव्हे तर जनसेवक आहे. विकासाचे कामे तर होणारच आहे. परंतु नागरिकांनी या वर्षात आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लक्षणे आढळळ्यास तपासणी करून घ्यावे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत तालुक्‍यातील प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जाणार आहे, असे ते म्हणाले

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment