पालकमंत्री मुश्रीफ यांच्या स्वास्थ्यासाठी विघ्नहर्तला साकडे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली होती.

दरम्यान मुश्रीफ साहेब कोरोना संसर्गातून लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी कोल्हापूर कागल कोविड केअर सेंटरमध्ये गणरायाची आरती करण्यात आली.

यावेळी कागल नगरपरिषदेचे पक्षप्रतोद नितीन दिंडे यांच्या हस्ते झालेल्या या आरतीमध्ये कोरोना ग्रस्तांसह कार्यकर्त्यांनीही विघ्नहर्त्याला साकडे घातले.

यावेळी कोरोनाग्रस्त म्हणून उपचार सुरू असलेले व्हन्नुरचे दिपक सदानंद यादव म्हणाले, आमच्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हेच देव व तेच विघ्नहर्ता आहेत.

कारण, बाहेर दवाखान्यांमध्ये दोन – दोन, तीन- तीन लाख घेऊन कोरोनाग्रस्तांची लूट सुरू असताना आम्ही मात्र येथे मोफत उपचार घेत आहोत.

सर्व सुविधांनी युक्त या केंद्रात आम्हाला जेवण ही घरच्यासारखे मिळत आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण एक कुटुंब म्हणूनच येथे आनंदाने जगत आहोत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment