अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्याच्या काही भागात मागील दोन दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे, सोनेवाडी ,पोहेगाव, डाऊच खुर्द, आदी परिसरात जोरदार पाऊस पडला. तालुक्यातील काल झालेल्या पावसामुळे पिके भुईसपाट झाले आहेत.
चांदेकसारे घारी या दोन गावाच्या मधून वाहणार्या जाम नदीला पूर आला. तर नदीवर बांधलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने घारी, चांदेकसारे, डाऊच बु गांवाचा संपर्क तुटला.
तर चांदेकसारे येथे समृद्धी महामार्गाने तयार केलेला इस्लामवाडी चांदेकसारे रस्ता पाण्याने वाहून गेला. सायंकाळी चार नंतर सुरू झालेला पाऊस तब्बल सहा वाजेपर्यंत सुरू होता.
गेल्या आठवड्यात समृद्धी महामार्गाच्या प्रशासनाकडे इस्लामवाडी व चांदेकसारे रस्त्याचीची मागणी केल्यामुळे त्यांनी त्या वेळी पावसात खराब झालेला रस्ता करून दिला. निकृष्ट पद्धतीने काम केल्यामुळे काल झालेल्या मुसळधार पावसाने हा रस्ता वाहून गेला.
या रस्त्याच्या बाजूला पाणी वाहून जाण्यासाठी नळ्या टाकलेल्या होत्या. मात्र रस्त्याचे काम निकृष्ट असल्याने त्या वाहून गेल्या. त्यामुळे अनेकांची घरे पाण्यात गेली.
मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे. या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने कुठे शेतात पाणी साचले.
तर कुठे उभे पीक भूईसपाट झाले. परिसरातील भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले. या सर्व परिसरातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुसकान भरपाई मिळावी. अशी मागणी चांदेकसारेचे माजी सरपंच केशवराव होन यांनी केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved