शहराला खड्डे मुक्त करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांचा मनपाला मोलाचा सल्ला !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर शहराची ओळख ही दिवसेंदिवस खड्यांचे शहर अशी होत चालली आहे. नगरकरांसह शहरातून प्रवास करणाऱ्या कित्येक नागरिकांना खड्यांचा त्रास सहन करावा लागतो आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने देखील जोरदार हजेरी लावली असल्याने यामध्ये आणखी भर पडत आहे. रिलायंस कंपनीने अहमदनगर महानगरपालिकाकडे खोदाई कामाकरीता ‘’६६ लाखाची’’ रक्कम जमा केलेली आहे.या रकमेतून शहरातील पॅचिंगचे काम व खड्डे बुजविण्याचे काम तातडीने सुरु करावे. कारण पुढील महिन्यापासून नवरात्री उत्सव सुरु होत आहे.

त्यापूर्वीच पूर्ण होणे गरजेचे आहे व ही कामे तत्काळ सुरू करण्यात यावी.तरी देखील मनपाला अधिक पैशांची गरज भासत असेल तर महानगरपालिकेतील ६८ नगरसेवक व स्वीकृत नगरसेवक ५ यांसह एकूण ७३ नगरसेवक आहेत. या सर्व ७३ नगरसेवक यांना सन. २०२०-२०२१ साठी ५ लाख रुपये प्रभागाकरिता देय केलेले आहेत.

यामधून प्रत्येकी “किमान एक लाख रुपये” एवढा निधी शहर खड्डेमुक्त करण्यासाठी जर दिले तर जमा होणारी ७३ लाख व रिलायंस कडून प्राप्त ६६ लाख असे एकूण १ कोटी ३९ लाख जमा होऊन या रकमेतून संपूर्ण शहर खड्डेमुक्त होईल, खड्ड्यांचे शहर ही ओळख पुसायची असेल तर वरील बाबींचा विचार करावाच लागेल,

असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महापौर दीप चव्हाण यांनी केला. तसेच कोरोनाच्या भीषण परिस्थितीमुळे सर्वसामान्यांसह मनपाचे देखील कंबरडे मोडले आहे आणि यामुळे मनपाचे बजेट मंजूर नाही. शहरात सुरू असलेल्या अमृत योजने अंतर्गत कामामुळे संपूर्ण शहरात ठेकेदाराकडून खोदकाम सुरू असल्याने शहरात खड्डे अधिकच वाढले आहे.

शहरात ज्याठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे त्याची WBM (खडीकरण) करण्याची जबाबदारी ही संबधित एजन्सीची (पर्यायाने ठेकेदाराची) आहे. ठेकेदारांनी ताबडतोब खडीकरणचे काम चालू करावे व त्यांना हे दिलेल्या कामाच्या आदेशात बंधनकारक आहे.

यासाठी मा. आयुक्त साहेबांनी तातडीने सदर कामांबाबत निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करून वेळ न घालवता ताबडतोब निविदा मागविण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, तोपर्यंत रिलायंस कंपनीचे पैसे ६६ लाखातून कुठल्याही ठेकेदाराचे बिल मनपाने अदा करू नये, अशी भूमिका देखील दीप चव्हाण यांनी मांडली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment