मराठा सामाजापाठोपाठ धनगर समाजही आक्रमक; करणार ‘असे’ काही …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- मराठा आरक्षणाच्या कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे. परंतु या सर्व घडामोडींमुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे.

या पार्श्वभूमीवर आंदोलनाची धग पुन्हा एकदा उभी राहू पाहत आहे. परंतु आता मराठा सामाजापाठोपाठ आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील धनगर समाजही आक्रमक झाला आहे.

अहमदनगरमध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल धनगर समाजाने निदर्शने करत आरक्षण देण्याची मागणी केली आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास वेळप्रसंगी रेल्वे रोखण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

राज्य सरकारने विधानसभा व विधानपरिषद दोन्ही सभागृहांमध्ये ठराव करून धनगर व धनगड हे एकच आहेत, अशी केंद्र सरकारला शिफारस करावी.

केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावून आदेश काढून आरक्षण द्यावे किंवा राष्ट्रपती महोदयांनी वटहुकूम काढून धनगर समाजाला आरक्षण द्यावे.

महाराष्ट्रातील धनगर समाज गेल्या ६५ वर्षापासून एसटी आरक्षणाची मागणी करत आहे, तरी त्याची रिट पिटीशन उच्च न्यायालयात चालू असून राज्य सरकारच्या वतीने फास्ट ट्रॅक कोर्टात ही रिट पिटीशन चालवून लवकरात लवकर न्याय द्यावा.

पदोन्नतीसाठी पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. ‘येत्या २५ सप्टेंबर नंतर राज्यातील सर्व नेत्यांची एक परिषद होणार आहे. त्यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे संघटनेचे निशांत दातीर यांनी सांगितले,

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment