उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातबारा उताऱ्यावर ज्यांचं नाव लिहिलेलं आहे, ते जर पक्ष बदलण्याचा विचार करत असतील तर मला खात्री आहे की उस्मानाबाद जिल्ह्यातील मावळे शरद पवार यांच्या विचारांना महत्त्व देऊन राष्ट्रवादीसोबत राहतील आणि पक्षाची साथ सोडणाऱ्या फुटिरांना पाडतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता त्यांनी कडाडून टीका केली.
वाशी (जि. उस्मानाबाद) येथे राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची जाहीर सभा झाली. प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, १५ वर्षे तुम्ही मंत्रिमंडळात होता, आता थोडासा पक्ष अडचणीत आल्यावर पक्ष सोडायला लागले. जेव्हा महाराष्ट्रात फंदफितुरी झाली आहे, तेव्हा त्यांना प्रायश्चित झालं आहे.
म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात कोणी फितुरी केली तर त्यांचा पाडाव करून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला निवडून द्या, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं.
- नेता नव्हे मित्र – मा.आ.डॉ.सुधीर तांबे
- महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांचे खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण सुरू
- मुंबई ते दिल्ली तब्बल 130 Kmph वेग ! अशी आहे देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन
- नितीन गडकरींची मोठी घोषणा ! टोल रांगेत थांबण्याची गरज संपणार…
- Cheapest electric car : १ लाखांत इलेक्ट्रिक कार ! सिंगल चार्जवर किती चालणार ?